डोंबिवलीत कलवा कारशेडहून कल्याणकडे येणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. सकाळी ८:०९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अप दिशेतील तीन लोकल गाड्या खोळंबल्या असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर लोकल सेवा १५–२० मिनिटे उशिराने सुरू आहेत.