टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधात कर्जत भिवपुरी येथील स्थानिकांनी जोरदार आवाज उठविलाय. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात एल्गार पुकारलाय.