लोकसभेच्या खासदारांसाठी हजेरीचा नवा नियम लागू होणार आहे. आता खासदारांना त्यांची हजेरी सभागृहात नेमून दिलेल्या आसनावरूनच नोंदवावी लागेल. यापूर्वी लॉबीमधून हजेरी लावण्याची सोय होती. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे बदल केले असून, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून ते अमलात येतील.