२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यटन नगरी लोणावळ्यात बाईक राइडर्सनी गर्दी केली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या रायडर्सनी लोणावळ्यातील थंड हवेचा मनसोक्त आनंद घेतला. गरमागरम चहा, भजी आणि लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्कीवर ताव मारत त्यांनी सुट्टीचा पुरेपूर अनुभव घेतला. हा दिवस लोणावळ्यातील पर्यटन आणि बाईक राइडर्सच्या उत्साहाने गाजला.