लोणावळ्यात पावसाची दमदार बॅटिंग कायम असून, अवघ्या चोवीस तासांत तब्बल ११९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पर्यटननगरीत सर्वत्र धबधबे, धुक्याची चादर आणि हिरवाईचे मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे.