मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर काल मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या गंभीर अपघाताने एकच खळबळ उडवून दिली. अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहतूक करणारा टँकर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ उलटल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला. आता या घटनेला जवळपास 24 तास उलटले आहेत, मात्र अद्याप टँकर बाजूला करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.