वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंत लाँग मार्च काढला आहे. विदर्भ आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा अशा घोषणा देत हा लाँग मार्च काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात विदर्भवादी यात सहभागी झाले होते. 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत हा लाँग मार्च काढण्यात आला.