राजूर ते अहिल्यानगर लाँगमार्चचा दुसरा दिवस आहे. लाँगमार्च अकोले शहरातून संगमनेरकडे रवाना झालं. आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लाँगमार्च काढण्यात आला. हजारो आंदोलक मजल दरमजल करत सगमनेरच्या दिशेने निघाले. सरकारकडून लाँगमार्चची दखल घेण्यात आली. आज विविध खात्यांचे मंत्री आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पाडली. मुंबईमध्ये मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं. किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना झालं. बैठकीत तोडगा न निघाल्यास लाँगमार्च पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावात धडकणार. डॉक्टर अजित नवले यांनी भूमिका मांडली.