जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सध्या गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रियंका गॅस एजन्सीच्या बाहेर अजूनही ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. अनेक ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे त्यांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागत आहे.