जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सध्या घरगुती एलपीजी गॅससाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा कायम दिसत असून अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.