इगतपुरी येथील सीएनजी पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य आज दिसत होते. पंपापासून ते महामार्गापर्यंत मोठी रांग लागली होती. सीएनजी गॅसचा तुटवडा असल्याने आणि विल्होळी येथील सीएनजी पंपाचे काम चालू असल्याने रांगा असल्याचे म्हटले जात आहे. नाशिक, सिन्नर, त्र्यंबक, कसारा येथून वाहनचालक आणि रिक्षा चालक एक तासांपासून रांगेत उभे होते. मात्र नंबर लागूनही सीएनजी मिळेल का नाही ? याची शाश्वती नव्हती.