पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर 32 तासांनंतर गॅस गळती झालेला अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात प्रशासनाला यश आलं. या टँकरमुळे एक्स्प्रेस वे ठप्प होता आणि वाहनांच्या अनेक रांगा लागल्या होत्या. रात्रीच्या वेळी मावळमधील सतीश साठे यांनी आपल्या ड्रोनच्या माध्यमातून या वाहतुकीच्या रांगा दाखवत अपघाताची दाहकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.