देशभरामध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. दुसरीकडे मात्र परभणीमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध नसल्याने पंप बंद करण्याची वेळ पंप चालकांवर आली आहे. तुरळक ठिकाणीच पेट्रोल आणि डिझेल मिळत असल्याने त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे.