कराड तालुक्यातील पाठरवाडी डोंगरावर भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त देवाचा छबिना निघाला. भैरवनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात भाविकांनी गुलालाची उधळण केली. यावेळी परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण होतं. यात्रेसाठी सातारा, सांगली जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येत आहे... सध्या यात्रेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.