राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मूळ गावी सुतारवाडी येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाची मनोभावे प्रतिष्ठापना केली आहे. गणरायाचे विराजमान झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी सहपरिवार भक्तिभावाने बाप्पाची आरती केली.