दुष्काळी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात या वर्षी गत पाच वर्षाच्या तुलनेत भूजल पातळी 1.75 मीटरने वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात नोंद केलेल्या भूजल निरीक्षणातून ही बाब समोर आली आहे. यंदा बीड जिल्ह्यात दिडशे टक्के इतका पाऊस झाला असून त्यात अतिवृष्टीची देखील नोंद आहे. त्याबरोबरच पावसाचा कालावधी देखील जास्त काळ राहिला. त्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.