अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावात विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. मोबाईल, टीव्ही आणि खेळांमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयावर भोंगा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. दररोज सायंकाळी नेमका सात वाजता हा भोंगा वाजतो.