आखाती देशांमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी सिलिंडर टंचाईचा पुण्याच्या ग्रामीण भागातील विविध धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम झाला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या उत्रौली गावातील शेटे कुटुंबात जावळ विधीचा कार्यक्रम होता. मात्र व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने आचाऱ्याने स्वयंपाक बनविण्यास नकार दिला. तेव्हा भावकीने एकत्र येत चुली मांडून संपूर्ण स्वयंपाक चुलीवर बनवला.