जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक कुटुंबांनी पर्याय म्हणून जळाऊ लाकडाकडे वळण्यास सुरुवात केली आहे.