बीडमधील मच्छिंद्रनाथ गड, मायंबा येथे आमदार सुरेश धस यांच्यासह सात लाख भाविकांनी मच्छिंद्रनाथांच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेतले. सावरगावातून चांदीच्या घोडेस्वार मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात भाविकांची अलोट गर्दी होती. तीन दिवसीय या यात्रेत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, तिचे ड्रोन दृश्य लक्षवेधी ठरले आहे.