खालापूर तालुक्यातील माडप ठाकूरवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने संतप्त ग्रामस्थांनी सावरोली-खारपाडा मुख्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून माडप ठाकूरवाडी रस्ता दुर्लक्षित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.