माढ्यातील अभय मानेने महाराष्ट्र राज्य पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. आईच्या निधनानंतरही खचून न जाता मिळवलेल्या या यशाबद्दल त्याची हरियाणा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आमदार अभिजीत पाटील व नगराध्यक्षांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला, हा माढा शहरासाठी गौरवाचा क्षण आहे.