पंढरपूर आषाढी एकादशीची वारी पूर्ण करून पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मराठवाडा आणि विदर्भातील वारकऱ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात सेवाभावाचं प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांच्या भोजनाची कोणतीही गैरसोय होऊ नये,या उद्देशाने स्वर्गीय गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने शहरात भव्य अन्नछत्र उभारण्यात आले आहे.