श्रावणातील पहिल्या सोमवारी कौपिनेश्वर मंदिरात शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी पत्नी नंदिनी विचारे यांच्यासमवेत कौपिनेश्वर महादेवाची, नागदेवताची नागपंचमीनिमित्त पूजा आणि महाआरती केली. दरवर्षीची परंपरा जपत विचारे दाम्पत्याने मंदिरात हजेरी लावून देवाचे दर्शन घेतले.