साताऱ्यातील सुरूर-वाई- पाचगणी-महाबळेश्वर- पोलादपूर रस्त्याचे मागील दीड वर्षापासून धीम्या गतीने काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप होत असून याच्या निषेधार्थ महाबळेश्वर बरोबरीने पाचगणी येथेही झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत आज 8 मार्चला महाबळेश्वर पाचगणी बंदची हाक देण्यात आली होती. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.