महाबळेश्वरमध्ये थंडीचा पारा ८ अंशांपर्यंत खाली घसरल्याने वेण्णा लेक परिसरात हिमकण गोठले आहेत. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांना दोन वर्षांनंतर हा अनोखा अनुभव मिळत असून पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे.