रायगड जिल्ह्यातील महाड एसटी बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. स्थानक परिसरात एक ते दोन फूट खोल असंख्य खड्डे पडल्याने एसटी चालकांना बस चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करत असताना त्यांनाही जीव धोक्यात घालून वावरावे लागत आहे.