अक्कलकुवा येथील यात्रा महोत्सवातील बैल बाजारात यावर्षी पहिल्याच दिवशी एक कोटीची विक्रमी उलाढाल झाली आहे. दहा हजार पेक्षा अधिक बैल विक्री साठी दाखल झाले आहेत. खिल्लारी, नागोरी, सातपुड्यातील स्थानिक प्रजातीच्या बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पहिल्या दिवशी तीन हजार बैलांची विक्री झाली आहे. अक्कलकुवा येथील महाकाली यात्रा उत्सवानिमित्त होणारा बैल बाजार गुजरात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमावरती भागातील सर्वात मोठा बैल बाजार भरला आहे.