धुळे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी उमेदवारी करण्याचे जाहीर केले. तर धुळ्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शहरातील यल्लमा माता मंदिराचे प्रमुख पुजारी आणि आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती जोगी या महापालिकेचे निवडणूक लढवणार आहेत. जनतेची सेवा करतानाच शहरातील प्रश्नांची निर्मूलन करण्यासाठी माझी उमेदवारी मी करणार असून शहरात अनेक प्रश्न आहेत रस्ते गटारांची स्वच्छता हे प्रश्न महत्त्वाचे असून महिलांचं प्रश्न गंभीर झाले आहेत. भारतीय जनता पार्टी कडे मी माझी उमेदवारी मागितली असून मुलाखत देखील दिले आहे.