महाशिवरात्रीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे जानगीर महाराज संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे यात्रेला सुरुवात झाली आहे. यानिमित्त संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी १११ क्विंटल गव्हाच्या पोळ्या आणि ७१ क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद हजारो भाविकांना वितरित केला जाणार आहे.