दिल्लीत लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय. नांदेडमध्ये सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलाय. या बंददरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत एसटी बस सेवा बंद राहणार आहे. नांदेड आगारातील सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या. पोलिसांच्या सुचनेनुसार एसटी बस सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आज सकाळी अचानकपने एसटी बस सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.