महाराष्ट्रातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे. काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. उर्वरित उमेदवारांची घोषणा पुढील दोन-तीन दिवसांत अपेक्षित आहे.