वाशिम जिल्ह्यातील दहा हजार हेक्टरवरील चिया पिकाला पीक विमा संरक्षण नाही. अवकाळी पाऊस व गारपिटीच्या धोक्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पीक विम्याअभावी संभाव्य नुकसानीची भीती असल्याने, कृषी विभागाने तातडीने चिया पिकाचा समावेश पीक विमा योजनेत करावा, अशी शेतकरी मागणी करत आहेत.