संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकारांचा गैरवापर वाढल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. कौटुंबिक वाद मिटवताना सासरच्या मंडळींना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसविण्याची प्रवृत्ती वाढत असून, यामुळे त्यांना दीर्घकाळ मनस्ताप सहन करावा लागतो. अशा प्रकरणांची वाढती संख्या चिंताजनक असून, कायद्यांचा सदुपयोग करणे आवश्यक आहे.