राज्यातील वीज कर्मचारी आज रात्री 12 वाजल्यापासून 72 तासांच्या संपावर गेले आहेत. खाजगीकरण, विशेषतः 200 कोटींहून अधिक खर्चाचे प्रकल्प खासगी संस्थांना देण्याला त्यांचा तीव्र विरोध आहे. वाटाघाटी निष्फळ ठरल्याने हा संप पुकारण्यात आला असून, महावितरण आणि महापारेषणचे बहुसंख्य कर्मचारी, अभियंते, अधिकारी यात सहभागी होणार आहेत.