जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी खरीप हंगामामध्ये सततचा पाऊस आणि अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सरसकट वाढीव रक्कम द्यावी या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील येथील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांनी जल समाधी आंदोलन केल. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली