महाराष्ट्र शासनाने शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय हा शब्द काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या वसतिगृहांना आता महापुरुषांची नावे दिली जाणार आहेत. मुलांच्या वसतिगृहांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, तर मुलींच्या वसतिगृहांना सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह असे संबोधले जाईल.