पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या कोळी महादेव आदिवासी बांधवांनी हातरगी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. सध्या शेतीत तण काढणी म्हणजेच खुरपणी सुरू आहे. याच कामाला उत्सवाचे स्वरूप देऊन सर्व आदिवासी बांधव एकत्र आले. या उत्सवात ढोलाच्या पारंपरिक तालावर नाचत-गाऊन शेतातील तण काढले जाते.