महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असतानाच, हिंगोली शहरात भारतीय जनता पक्षाने विजयाचा जल्लोष केला आहे. संपूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. या जल्लोषामध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.