जामनेर तालुक्यातील राजनी गावातील एका तरुणाने जीवे मारण्याच्या धमकीमुळे आत्महत्या केली. त्याने धमकी देणाऱ्याचे नाव लिहून ठेवले होते. तरीही अद्याप अटक न झाल्याने, नातेवाईक आणि ग्रामस्थानी जामनेर रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले.