अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून वनविभागाकडून बिबट्यांची धरपकड सुरू आहे.. जिल्हाभरात शेकडो पिंजरे लावण्यात आले आहेत.आज श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे..जिल्हाभरात 1150 पेक्षा जास्त बिबटे असून आत्तापर्यंत जवळपास तीस बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे.