नाशिकमधील येवला नगरपालिकेच्या डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी १० वाजता सुरू झाली आहे. १३ प्रभागांतील २६ नगरसेवक आणि एका नगराध्यक्षासाठी ९० उमेदवार रिंगणात होते. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) की शिवसेना (शिंदे गट) बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.