महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. अलिबागमध्ये शेकापचे अक्षय नाईक विजयी झाले. तर, पन्हाळा गिरिस्थानमधून जनसुराज्य पक्षाच्या जयश्री पवार नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. महायुतीने १९३ जागांवर आघाडी घेतली असून, महाविकास आघाडीला ४८ जागा मिळाल्या आहेत, तर स्थानिक आघाड्या १६ जागांवर पुढे आहेत.