रायगड जिल्ह्यातील उरण नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला. एका नाश्ता कॉन्ट्रॅक्टरने आयटी सेलमध्ये अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप मतदारांनी केला. सीसीटीव्ही फुटेजची मागणी करत, मतदारांनी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटनेमुळे मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा करण्यात आला.