महाराष्ट्र नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. चिपळूणमधून भास्कर जाधव यांची कन्या कांचन शिंदे विजयी झाल्या आहेत. अमरावती-नांदगावातून ठाकरे गटाच्या प्राप्ती मारोतकर यांनी विजय मिळवला. तुळजापूरमध्ये भाजपचे विनोद गंगणे नगराध्यक्षपदी विजयी झाले. महायुतीने २०० चा टप्पा पार करत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.