महाराष्ट्र नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूरच्या मूलमध्ये मुनगंटीवारांना, तर बीडच्या धारूरमध्ये पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. धारूरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार पराभूत होऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले. काँग्रेसने गोंदियाच्या गोरेगाव आणि चंद्रपूरच्या मूलमध्ये विजय संपादन केला.