रक्ताचे पाणी करून पिकवलेला कांदा आता शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर उठला आहे. उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ आणि बाजारपेठेत कोसळलेले दर यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा उत्पादकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारचे धोरण शेती उध्वस्त करणारे असल्याचे मत शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.