अजित पवारांनी शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना पक्षातून दूर ठेवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले नाही, असा आरोप विजय घाडगे यांनी केला आहे. यामुळे अजित पवारांना आता हे परवडणार नाही, अशी भूमिका घाडगे यांनी मांडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचारात शेतकरी आणि अखिल भारतीय छावा संघटना अजित पवारांचा तीव्र विरोध करतील, असा इशाराही त्यांनी दिला.