महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात, म्हणजेच शिवडी, वरळी आणि सायन कोळीवाडा येथे आज संध्याकाळी सभा घेणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडी, उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि लातूरमध्ये प्रचार करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात रोड शो काढणार आहेत.