पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यास काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी ही भूमिका मांडली, महाविकास आघाडी ही शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची नैसर्गिक आघाडी असल्याचे म्हटले आहे. जातीयवादी पक्षासोबत आघाडी नको, असेही जोशींनी स्पष्ट केले.